मेणबत्या तयार ठेवा. राज ठाकरे
राज ठाकरे शाब्दिक फटकेबाजी करण्यात माहीर आहेत. त्यांचे मुद्दे अनेकदा योग्य असतात. आता त्यांनी
एक उपरोधिक टोला राज्य सरकार ला हाणला आहे. येत्या १८ नोव्हेंबर रोजी राज्य सरकार पुरस्कृत
अघोषित लोडशेडिंग केले जाणार आहे. त्यामुळे आपल्याकडचे जनरेटर्स , इनव्हर्टर्स आणि मेणबत्या तयार
ठेवाव्यात असे आवाहन राज ठाकरे यांच्या पेज्वरून करण्यात आले आहे. शनिवारी १८ नोव्हेंबर रोजी राज
ठाकरे ह्यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेच्या पार्शभूमीवर हे आवाहन करण्यात आले आहे. राज
ठाकरे ह्यांचे भाषण महाराष्ट्राच्या जनतेला ऐकता येवू नये म्हणून १८ तारखेला लोड शेडींग केली जावू
शकते. इंटरनेट सेवा जाणीवपूर्वक विस्कळीत केली जावू शकते, केबल बंद होवू शकतात असा संशय
मनसेला आहे. जनहितार्थ महत्वाची माहिती या मथळ्याखाली हि पोस्ट अपलोड करण्यात आली आहे.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews